धाराशिवशैक्षणिक

खेड शाळेमध्ये निरोप व सत्काराचा कार्यक्रम उत्साहात

लोहारा / प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथे आज भावनिक वातावरणात निरोप समारंभ व सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतून बदली होऊन गेलेल्या पाच शिक्षकांना निरोप देण्यात आला तर नवीन रुजू झालेल्या पाच शिक्षकांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांमध्ये महादेव गव्हाळे, रामदास कांबळे, बालाजी साठे, सुभाष गायकवाड व शफिक गवंडी यांचा समावेश होता. त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आपुलकीचे अश्रू दाटून आले. तर नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये मोईज सौदागर, राहुल भेडे, सुरेश साळुंके, मल्लिकार्जुन कलशेट्टी व सौ. सुनंदा निर्मले यांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांनी निरोपाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व खाऊ भेट स्वरूपात दिला.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे, लोहारा केंद्राचे विस्तार अधिकारी विश्वजीत चंदनशिवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरवीन शेख, उपाध्यक्ष अश्विनी कांबळे, सदस्य जया कांबळे, सतिश पवार, किसन पवार, विकास सगर, शिक्षणप्रेमी पालक मुबारक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम आलमले यांनी केले तर आभार मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!