धाराशिवमहाराष्ट्र

तुळजापूर : शारदीय नवरात्र पुर्वीची श्री तुळजाभवानी मातेची घोर निद्रेस प्रारंभ

तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस आठ दिवसांच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला.

 

सायंकाळी साडेसहा वाजता अभिषेक घाटावर देवीस नित्यनेमाने पुजेची हाक देण्यात आली. त्यानंतर सायं सात वाजता पंचामृत व शुद्धजल स्नान घालून मेण काढणे विधी सचिन कदम परमेश्वर यांनी केला. विधीनंतर १६ आणे भोपी पुजाऱ्यांच्या मानाच्या आरत्या ओवाळून देवीस नैवेद्य दाखविण्यात आला.

 

यानंतर सिंहासनावरून देवीची मूर्ती उपस्थित भोपीपुजारी बांधवांकडून मंचकी निद्रेसाठी आणण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या पत्नी, तहसीलदार व व्यवस्थापक माया माने, सहाय्यक तहसीलदार अरविंद बोळंगे, विश्वास कदम, नागेश शितोळे, चिलोजीबुवा, हमरोजीबुवा, भोपी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्यासह सेवेकरी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी “आई राजा उदो उदो” चा जयघोष, भंडाऱ्याची उधळण आणि भक्तिभावाने सजलेले वातावरण अनुभवायला मिळाले. देवीच्या निद्रेनंतर शासकीय आरती, मानाच्या आरत्या, धुपारती, नैवेद्य, प्रक्षाळ पूजा तसेच शेजारतीचे विधी पार पाडण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!