धाराशिवशैक्षणिक

शिक्षिका श्रीम. आशिफा सय्यद यांचा सीईओ यांच्या हस्ते गौरव – उंडरगाव शाळेची राज्यस्तरीय दखल!

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा उंडरगाव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारणही तसंच मोठं आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या “विनोबा अॅप” वर उत्कृष्ट कामगिरी करत, शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या उपक्रशील शिक्षिका श्रीम. आशिफा सय्यद यांचा नुकताच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आदरणीय मैनाक घोष साहेब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी आशिफा मॅडम यांना “विनोबा किट व प्राशस्तीपत्र” प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, याआधी देखील सीईओ साहेबांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला होता. म्हणजेच त्यांच्या कामगिरीची नोंद ही केवळ एकदाच नव्हे, तर वारंवार घेतली जात आहे.

सन्मान सोहळ्याला विनोबा जिल्हा समन्वयक सोमनाथ स्वामीमुजावर सर उपस्थित होते. त्यांनीही आशिफा मॅडमच्या कामगिरीचं कौतुक करत, “उपक्रमशील शिक्षिका म्हणजे नेमकं कसं असावं याचं उदाहरणच आशिफा मॅडम आहेत” अशी प्रतिक्रिया दिली.

उपक्रमांचा गोडवा – विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
आशिफा मॅडम शाळेत विविध उपक्रम राबवतात. स्पेलिंग बी स्पर्धा, क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी तर निर्माण झालीच, पण त्यांच्यात धाडसी वृत्तीही विकसित होत आहे. त्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‍ शाळेत बदल्यांची नवी ऊर्जा
दरम्यान, शासनाच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेनुसार उंडरगाव शाळेतून मुख्याध्यापक राजू माळवदकर व शिक्षक युसूफ पटेल यांची बदली झाली. त्यांच्या जागी नवे पदवीधर शिक्षक मोहन अगंबरे व शिक्षिका जयश्री घोबाडे मॅडम यांनी रुजू होऊन शाळेला नवी ऊर्जा दिली आहे.

उंडरगाव शाळा आज जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चेत आहे. कारण इथे फक्त शिक्षण दिलं जात नाही, तर शिक्षणाची खरी चव मुलांना चाखायला मिळते. त्यामागे आशिफा मॅडमसारख्या उपक्रमशील शिक्षकांचा हातभार आहे, हे निश्चित!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!