धाराशिवशैक्षणिक

आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले गेले लोहारा शहरातील राजकुमार माणिकशेट्टी सर 

धाराशिव : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या शिक्षकांना समाजाकडून वेळोवेळी सन्मानित केले जाते. धाराशिव तालुक्यातील कौडगाव ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२५-२६ लोहारा शहरातील प्रगल्भ व कर्तव्यदक्ष शिक्षक राजकुमार नागप्पा माणिकशेट्टी यांना प्रदान करण्यात आला.

या विशेष सोहळ्याला ग्रामपंचायत सरपंच दयानंद थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अहेमद शेख, मुख्याध्यापक राजेश घोंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या गौरवामुळे माणिकशेट्टी सरांचे शैक्षणिक कार्य अधिक उजळून निघाले असून उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

राजकुमार माणिकशेट्टी सर यांनी आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानाची मशाल प्रज्वलित केली नाही तर शिस्त, नैतिकता आणि सामाजिक जाणीवा रुजविण्याचे कार्यही सातत्याने केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत कौडगाव ग्रामपंचायतीने केलेला सन्मान निश्चितच शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 सन्मान स्वीकारताना राजकुमार माणिकशेट्टी सर म्हणाले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून जबाबदारी आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे, समाजासाठी कार्य करावे हाच माझा ध्यास आहे. माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी ग्रामपंचायत व समाजाचा मनःपूर्वक आभारी आहे.”

 

 उपस्थितांनी व्यक्त केले की, “गुरुजींचा हा सन्मान हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, त्यांच्या कार्यामुळेच विद्यार्थी घडत आहेत आणि समाज पुढे चालला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!