धाराशिवराजकीय

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उमरगा-लोहारा तालुक्यात दौरा

उमरगा / लोहारा : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी उमरगा व लोहारा तालुक्यात विविध कार्यक्रमांसाठी दौरा नियोजित आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

  • दुपारी १२:०० वाजता मौजे मार्डी येथे अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी.

  • १:०० वाजता मौजे माकणी येथे निम्न तेरणा प्रकल्पाचे जलपूजन.

  • १:३० वाजता मौजे राजेगाव व एकोंडी (लो.) येथे अतिवृष्टी पाहणी.

  • ३:०० वाजता उमरगा येथे “माझा वार्ड माझी जबाबदारी” या उपक्रमाचे उद्घाटन.

  • ४:०० वाजता श्री मंगल कार्यालय, उमरगा येथे पदाधिकारी बैठक.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी उमरगा, तहसीलदार लोहारा, गटविकास अधिकारी लोहारा, विविध विभागांचे उप कार्यकारी अभियंते, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक लोहारा यांच्यासह शेतकरी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!