कोराळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे माजी मंञी बसवराज पाटील यांच्या हस्ते अनावरण

उमरगा : उमरगा तालुक्यातील कोराळ येथे शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अवघ्या विश्वाचे अराध्य दैवत, श्रीमंतयोगी, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयाचा अनावरण सोहळा राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी ज्यांच्या संकल्पनेतून पुतळा उभारण्यात आला ते माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी टिपरी, ढोल पथक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानी आसमंत दणाणून गेला होता.
आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी यांनी कोराळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवून देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पनेतून कोराळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १५ फुट उंचीच्या पुर्णाकृती पुतळयाचा रविवारी (दि.१९) सकाळी राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते अभूतपूर्व अनावरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिल साळुंके होते. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता माजी जिप सदस्य रफीक तांबोळी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळयाला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी टिपरी व ढोल पथकातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी ॲड. सुभाष राजोळे, नानाराव भोसले, विजयकुमार सोनवणे, आबासाहेब साळुंके, चंद्रशेखर पवार, माणिक राठोड, धनराज टिकंबरे, परमेश्वर घोरपडे, कोराळचे सरपंच मंजुषा सगर, उपसरपंच निर्मलाताई भगत, अशोक पाटील, अजय पाटील, सुधीर भगत, विलास भगत, महेश भगत, विष्णू भगत, विठ्ठल लाळे, अमर भगत, आण्णाराव माने, दिलीप सुरवसे, हरीदास पवार, बालाजी मंगरुळे, विक्रम दासमे, शषीकांत चव्हाण, जीवन पाटील, विजय सोनकटाळे आदीसह पंचक्रोशीतील शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भगत, सूत्रसंचालन शाम सुरवसे यांनी तर महेश भगत यांनी आभार मानले.
रफीक तांबोळी हे आपल्यातील मदारी मेहेतर – माजी मंञी बसवराज पाटील
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी भाग्य लागते. वर्षानुवर्षे राहणारी ही वास्तू आहे. सामान्यांना न्याय देण्याचे काम श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणे गरजेचे आहे. रफीक तांबोळी यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्याची इच्छा आज पूर्ण झाली आहे. परिस्थितीने नाही तर मनाने मोठया असलेल्या माणसांच्या हातुनच अशी कामे होतात. रफीक तांबोळी यांना जिल्हा परिषद सदस्य केल्याचा सार्थ अभिमान मला असुन रफीक तांबोळी हे आपल्यातील मदारी मेहेतर असल्याचे कौतुकोद्गार बसवराज पाटील यांनी काढले.अनेक दिवसाची स्वप्नपूर्ती झाली – तांबोळी
सर्व जाती धर्माला सोबत घेऊन बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जनतेचे राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांना आयुष्यभर मोठया संघर्षाला तोंड द्यावे लागले. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, जानता राजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प आग्रा येथे केला होता. तो संकल्प आज पूर्ण झाल्याने हा माझ्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च छण असुन अनेक वर्षांपासूनची माझी आज स्वप्नपूर्ती झाल्याचे रफीक तांबोळी यांनी सांगितले.