लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील विलासपुर पांढरी येथील शिवाजी मुळे हे त्याचे राहाते घराला कुलूप लावून गावी गेले असता अज्ञात व्यक्तीने 16 एप्रिल दुपारी साडेबारा ते पावने दोनच्या सुमारास कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण दोन लाख चार हजार रुपये किंमतीचे चोरुन नेले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात शिवाजी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.