सखी स्मार्ट गृहिणी स्पर्धा उत्साहात संपन्न

लोहारा ( जि.धाराशिव ) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने खास महिलांसाठी आगळीवेगळी लोहारा शहरात प्रथमच सखी स्मार्ट गृहिणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन लोहारा येथील प्रसिद्ध डॉ.सौ.रूपाली हेमंत श्रीगीरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षीका वर्षा चौधरी,महानंदा चव्हाण,निर्मला दंतकाळे,अर्चना साखरे,शामल ठोंबरे उपस्थित होत्या.यावेळी रूपाली श्रीगीरे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून फीत कापुन उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीगीरे यांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने वर्षा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महिलांसाठी विरूंगळा व तणावमुक्त राहण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यानंतर श्रीगीरे यांनी उखाणा घेवून व बकेट बॉल टाकून स्पर्धेची सुरवात करण्यात आली.यास्पर्धेमध्ये शब्द आमुचा उखाणा तुमचा,बकेटमध्ये चेंडू टाकणे,शब्द आमुचा गीत तुमचे व बौध्दिक यामध्ये महापुरुषावर आधारीत प्रश्नांचा समावेश होता.
चार फेऱ्यामध्ये स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेचा आनंद घेत आगळीवेगळी स्पर्धा घेतल्याबद्दल आयोजकाचे अभिनंदन केले.या स्पर्धेमध्ये सखी स्मार्ट गृहिणी प्रथम- प्रणाली सावंत, द्वितीय- मधुबाला औटे, तृतीय-मोनाली वाघमारे, उत्तेजनार्थ-निर्मला दंतकाळे यांनी पारितोषक मिळवली.त्यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र,चषक देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ.रूपाली श्रीगीरे,सुनिता पवार,सारिका वाघमोडे,नितीन वाघमारे,भागवत वाघमारे यांचे सहकार्य लाभले,.यावेळी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून विकास घोडके यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी अमित बोराळे,महादेव कुंभार,बालाजी मक्तेदार, रसूल शेख, सचिन भंडारे,नरेंद्र औटे यांचे सहकार्य लाभले.यावेळी दिक्षीत पी.आर ,सुप्रिया माळवदकर,मधुबाला औटे,भाग्यश्री कांबळे,मिनाक्षी पांचाळ, प्रियंका भंडारे, रुपाली वाघमारे, जान्हवी घोडके,वाघमारे एम. एन, कांबळे आर. एस, सुरवसे आर डी, माया कांबळे, वाघमारे एम. वाय यांच्यासह अनेक महिला स्पर्धक सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया-
1) आजची स्पर्धा आगळीवेगळी होती. अशाच स्पर्धेचे आयोजन करून महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल आयोजकाचे आभार अशीच संधी यापुढेही उपलब्ध करून द्यावी- महानंदा चव्हाण

2) सखी स्मार्ट गृहिणी स्पर्धा हे महिलासाठीच व्यासपीठ दरवर्षी उपलब्ध रहाव.यापुढील काळात अजून चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांना एका वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आल याचा आनंद आहे. -वर्षा चौधरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!