पैशांच्या देण्या – घेण्यावरून झालेल्या हाणामारीत लोहाऱ्यात एका तरूणाचा मृत्यू

लोहारा (जि.उस्मानाबाद ) : पैशांच्या देण्या-घेण्यावरून झालेल्या हाणामारीत एका २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या मागच्या बाजूस घडली. या प्रकरणी आरोपीस अटक करून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, शंकर कल्यामोळ (वय २५) असे मयताचे नाव आहे. रविवारी ६ नोव्हेबर रोजी सकाळी मयत शंकर हा आपल्या चुलत भाऊ सखाराम कल्यामोळ याच्याबरोबर दुचाकीवरून लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल इंग्लिश स्कूल जवळ असलेल्या एका ठिकाणी शिंदी पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुऱ्या उर्फ प्रल्हाद गुंडू घोडके याने शंकर कल्यामोळ याला तुझ्याकडे माझे असलेले एक हजार रुपये दे, असे म्हणाला, तेव्हा शंकर याने त्यास आता माझ्याजवळ पैसे नाहीत, शुक्रवारी देतो असे म्हणाला. परंतु प्रल्हाद याने पैसे आत्ताच हवेत नाहीतर तुझी दुचाकी घेवून जातो असे म्हणत त्याने शंकर यास उचलून रोडवर खाली आपटले. यावेळी शिंदीचे दुकान चालक उमेश गोरे याने शंकर व त्याचा चुलत भाऊ सखाराम यांना गाडीवर बसवून घरी आणले. परंतु तेव्हा शंकर काहीही बोलत नसल्याने त्याला दवाखान्यात घेऊन गेले असताना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अशी फिर्याद शंकरचा चुलत भाऊ सखाराम कल्यामोळ यांनी दिल्यावरून मुऱ्या उर्फ प्रल्हाद याच्याविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

🔶 दरम्यान, शंकर कल्यामोळ याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या १० ते १२ नातेवाईकांनी आरोपी मुऱ्या याच्या घरावर हल्ला केला. त्याच्या घरासमोरील दुचाकीची नासधूस करण्यात आली. हल्ला होत असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस येताच जमाव पळून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!