शेतकऱ्यांचे थांबवलेले खाते सुरू करा ; संभाजी ब्रिगेड

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शेतकऱ्यांचे थांबवलेले खाते सुरू करा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देण्यात देईल. असा इशारा बँकेच्या शाखा अधिकारी यांना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजीदिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे. की, आपल्या बँकेने खातेदार शेतकऱ्यांचे खाते होल्ड केलेले आहे अगोदरच शेतकरी दुष्काळाने ग्रस्त झालेला आहे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे आपल्या बँकेने त्याची खाते होल्ड करून शेतकरी बांधवांना अडचणीत आणण्याचे काम आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक करत आहे जर का आपल्या अशा कृत्यामुळे एकाद्या शेतकऱ्याचे बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल
तसे घडण्या अगोदर तात्काळ त्याचे खाते सुरळीत करून त्याच्या खात्यावरील रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळावी अशा प्रकारचे उपाय योजना आपण करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल ने उत्तर देण्यात देईल आणि त्यास पूर्णतः महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्था जबाबदर असेल.
संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रमुख बालाजी भागवत यादव संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष खंडू शिंदे संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे विकास चौधरी, विशाल चौधरी, प्रशांत चव्हाण, स्वप्नील चौधरी, प्रशांत चौधरी, विशाल शितोळे,गुलाब चव्हाण, सुजित चव्हाण, नागेश जेवळे, सचिन दसमे, धनराज चव्हाण,कैलास जाधव, लक्ष्मण पाटील, तानाजी सोमवंशी,पवन चौधरी, निखिल देवकर निवेदनावर आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.