लोहारा (प्रतिनिधी) – रमजान ईद आणि भाजपा तालुका सरचिटणीस तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्य हाती घेण्यात आले. 28 मार्च 2025 रोजी तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप करण्यात आले.
HTML img Tag

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिलाप मित्र मंडळाचे जलाल इकबाल मुल्ला, सुरज शिंदे, अदित्य पवार, तोहिद इनामदार, संतोष मुळे सर, नेताजी सोमवंशी सर, श्रीमती सुनिता भोरे मॅडम, शिवानंद मुळे, रूपाली माटे, मारुती देवकर, अनिल सोमवंशी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान, सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल मिलाप मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल सोमवंशी यांनी केले तर आभार संतोष मुळे सर यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!