धाराशिव

लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

लोहारा : लोहारा येथील भारतमाता मंदिर याठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी लोहारा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ वैशालीताई खराडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ रुपाली श्रीगिरे, नगरसेविका श्रीमती शामलताई माळी, मंदिर समिती सदस्या सौ विजयाताई पाटील, सौ सुलक्षणा जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 

HTML img Tag Simply Easy Learning

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री शहाजी जाधव यांनी सांगितले की, दरवर्षी भारतमाता मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत असतो त्याचबरोबर श्रीराम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती संपन्न झाली.

 

त्यानंतर बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी बालसंस्कार शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना पाटिल मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यानंतर वैशालीताई व डॉ रुपाली मॅडम यांनी श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्वांना शूभेच्छा व्यक्त केल्या.

 

श्रीराम जन्मोत्सव सोहळा व बालसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्प समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, प्राचार्य शहाजी जाधव, शिक्षक दयानंद क्षीरसागर, व्यंकटेश पोतदार, विरेश स्वामी, यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय पोतदार यांनी योगदान दिले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!