लातूर: महाराष्ट्र ऑर्गनायझेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन अँड रूरल नेटवर्क संचलित हरंगुळ (बु) येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थेने आपल्या यशस्वी वाटचालीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. गुरुवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेच्या दुसऱ्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, या कार्यक्रमात पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शाळेच्या प्रशासनातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शाळेच्या अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी सर्व पालक, हितचिंतक आणि विद्यार्थी यांना या विशेष सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रम स्थळ: स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल, हरंगुळ (बु), लातूर
विशेष:
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(संपर्क: 9309319637, 9923849415, 9921137121)