कदेर येथील लिंगायत समाजाला स्मशानभूमी २० दिवसात द्या

उमरगा : महादेव पाटील
उमरगा तालुक्यातील कदेर येथील लिंगायत समाजाला वारंवार मागणी करूनही स्वतंत्र स्मशानभूमी (रुद्रभूमी) अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीचे निवेदन लिंगायत सेवा संघ कडून मराठवडा विभागीय अध्यक्ष देवराज संगुळगे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.५) रोजी नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, लिंगायत समाजात मृत्युनंतर देह हा पुरण्याचा म्हणजेच दफन करण्याची पध्दत आहे. त्यामुळे लिंगायत समाजाला मृतदेह दफन करण्यासाठी कदेर ता.उमरगा या ठिकाणी स्मशान भूमी उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह ताटकळत ठेवावे लागते काही वेळा गावाकडच्या कोणाच्या शेतात वगैरे दफन करावा लागतो. त्यामुळे ही अडचण दुर करण्यासाठी आपल्या माध्यमातून लिंगायत स्मशाभूमी मिळवून द्यावे ही विनंती करण्यात आली होती,त्यानुसार आपण भूमिअभिलेख उप अधीक्षक व मंडळ अधिकारी यांना पुढील कारवाईसाठी ९ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे कळवले आहे,तीन महिने होत आले तरी देखील त्यांच्या कडून कुठलीच कारवाई होत नाही,आम्ही चौकशी केल्यास उडवाउडवीचे उत्तर भेटत आहेत,त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून सहकार्य करण्यात यावे. २० दिवसात यावर तोडगा न काढल्यास जनआंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर विवेकानंद चौधरी,हणमंत शंके,स्वप्नील सुतार,शिवा सुतार, गुंडेराव चौगुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🔴 कदेर येथील स्मशानभूमीच्या जागे साठी तेथील समाजबांधव अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत अद्यापही त्यांना न्याय मिळत नाही,जर २० दिवसात त्यांना न्याय मिळाला नाही तर लिंगायत सेवा संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल.