महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नूतन गटशिक्षण अधिकारी यांचा सत्कार

लोहारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा तर्फे सन्माननीय नूतन गटशिक्षणाधिकारी लोहारा श्री सय्यद ए. ए. यांचा लोहारा गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच केंद्रप्रमुख श्री बापू शिंदे यांचेही स्वागत यावेळी शिक्षक समितीतर्फे करण्यात आले. यावेळी नूतन गटशिक्षण अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. यावेळी शिक्षक समितीच्या ध्येयधोरणाविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी समितीचे जिल्हा प्रवक्ते श्री कमलाकर येणेगुरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री बळी आलमले शिक्षक नेते श्री साठे बी.के .,शिक्षक सोसायटीसंचालक श्री दत्तात्रय फावडे, श्री कैलास माणिकशेट्टी, लोहारा तालुकाध्यक्ष श्री भिमाशंकर डोकडे ,शालार्थ प्रमुख श्री नागेश बंगले, सरचिटणीस श्री सोमनाथ चीनगुंडे, श्री संजय माशाळकर, श्री रणखांब अप्पा, , श्री सर्जे अंनाप्पा, मुख्याध्यापक श्री किशोर भोसले, श्री कवाळे सर,श्री तानवडे सर, श्री अवधूते सर, श्री काटमोडे सर, श्री तावरे मामा , शिक्षक समिती पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.