लोहारा ( जि.धाराशिव ) : आष्टा कासार येथील ग्रामदैवत असलेले श्री 1008 श्री विघ्नहर पार्श्वनाथ दिगंबराचा वार्षिक यात्रा महोत्सव दि. 27 व 28 एप्रिल 2024 रोजी आष्टा कासार ता.लोहारा जि. धाराशिव येथे संपन्न होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भक्तांचे दैवत असलेले, सर्व दूर प्रसिद्ध असलेले हे पार्श्वनाथचे जैन मंदिर आहे.या मंदिरास प्रत्येक रविवार व अमावस्याला भक्तांची अलोट गर्दी असते. मुंबई, पुणे, हैदराबाद, जळगाव, नाशिक, गुलबर्गा, विजापूर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर इतर सर्व भागातुन दर्शना साठी असंख्य भक्त येतात.दि. 27 रोजी आष्टा कासार येथील रहिवासी असलेले जेष्ठ न्यायाधीश श्री.अजितजी बाबुराव भस्मे व धर्मपत्नी सौ.निता यांच्या हस्ते पार्श्वनाथाचा अभिषेक, महापुजा होणार आहे. तसेच येथीलच डॉ.शरद प्रेमचंद पंडित व धर्म पत्नी सौ.शोभा यांच्या तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. व रात्री महाआरती,भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दि. 28 रोजी जल यात्रा व कुंभ मिरवणूक निघणार आहे, तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन व सत्कार होणार आहेत.
तसेच दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्वांनी या महायात्रे निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आष्टा कासार येथील मंदिराचे पुजारी रमेश पंडित साहेब, सर्व जैन बांधव,नागरिक करीत आहेत.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!