लोहारा/प्रतिनिधी
भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने शहरातील गरीब कुटुंनाना किराणा किट व अन्न, धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादा मुल्ला, जब्बार मुल्ला, स्वराज्य संघटना तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, गौरव गोसावी, प्रतिक गिरी, भाजपा तालुका चिटणीस युवराज जाधव, महेबुब मुल्ला, नयुम सवार, शंभु वाले, खाशिम मुल्ला, सिंदबाज सय्यद, आदम मुल्ला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.