धाराशिव

संघटन पर्व 2024-25 भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

लोहारा (धाराशिव) / प्रतिनिधी
‘संघटन पर्व 2024-25 भाजपा सदस्य नोंदणी अभियान’ अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.5 जानेवारी 2025 रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ‘संघटन पर्व 2024-25 भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा नोंदणी सहसंयोजक विक्रांत संगशेट्टी, नोंदणी तालुका संयोजक तथा तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, बबनगिरी महाराज, नोंदणी तालुका सहसंयोजक तथा तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, संजय कदम, तालुका चिटणीस सुरेंद्र काळप्पा, युवराज जाधव, परमेस्वर कदम, प्रशिध्दी प्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, जनक कुलकर्णी, विजय महानुर, कल्याण ढगे, सिद्धेश्वर बिडवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!