लोहारा प्रतिनिधी
लोहारा शहरातील लोक वाचनालयात. तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले पत्रकार दिन यावेळी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
दिनांक 6 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येते शहरातील लोक वाचनालयात पार पडलेल्या या जयंती उत्सव सोहळ्याला पोलीस निरीक्षक अजित चितले उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख सहाय्यक गटविकास अधिकारी वग्गे गट शिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण लोक वाचनालयाच सचिव माणिक तिगाडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी बाळशास्त्री शास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान बद्दल पत्रकार जसवंतसिंह बायस मंडळ निरिक्षक जगदीश लांडगे यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तालुक्यातील पत्रकारांच्या या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या
यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख नगरसेवक प्रशांत काळे माजी नगरसेवक हरिभाऊ लोखंडे लोकमंगल मल्टीस्टेट च वतीने शाखाधिकारी प्रताप घोडके दगडू तिघाडे कल्याण ढगे प्रमोद पोतदार सामाजिक व राजकीय क्षेत्रातील या पदाधिकाऱ्यानी सर्व पत्रकारांच्या शाल पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सत्कार सत्कार केला.
या कार्यक्रमाला शाम नारायणकर शंकर झिगाडे संजय जेवळीकर विजय महापुर जयश्री लांडगे मनीषा महानुर तुकाराम विरोधे प्राचार्य शहाजी जाधव रमेश वाघोले आदींसह बहुसंख्य वाचक पत्रकार बालाजी बिराजदार महबूब फकीर अब्बास शेख यशवंत भुसारे गणेश खबुले सुमित झिगाडे इकबाल मुल्ला सुधीर कोरे सदाशिव जाधव आदम पठाण अशोक दुबे सुनील ठेले गिरीश भगत आदम पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जसवंत सिंह बायस आभार प्रदर्शन गायकवाड यांनी मानले