प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपध्यक्षाची निवड

धाराशिव : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री वर्षद तात्या शिंदे यांच्या हस्ते लोहारा तालुक्यातील शितलनगर तांडा येथील श्री दयानंद राठोड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख श्री केदार सर तसेच नवनियुक्त जिल्हा उपप्रमुख दिनेश जी गुडे नवनियुक्त परंडा तालुकाप्रमुख आप्पासाहेब तरटे नवनियुक्त धाराशिव तालुका प्रमुख श्री प्रजय पवार तसेच तुळजापूर प्रहार संघटना तालुकाप्रमुख श्री शशिकांत मुळे तय्यब शेख परंडा महिला आघाडी प्रमुख सौ लक्ष्मीबाई शिंदे व संपूर्ण जिल्हाभरातून आलेले प्रहार सैनिक उपस्थित होते.