पोस्ट खात्याच्या देशव्यापी बेमुदत संपाला लोहारा कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

लोहारा / प्रतिनिधी
पोस्ट खात्यातील ग्रामीण डाक सेवकांचे विविध मागण्यासाठी देशव्यापी बेमुद्दत संपा मध्ये लोहारा येथील डाक कर्मचाऱ्यांनी देखील या बेमुदत संपामध्ये सहभाग घेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे
सध्या पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप सुरू असून या संपामध्ये लोहारा शहरातील पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील या देशव्यापी संपाला पाठिंबा देत बेमुदत संपावर गेले आहेत. लोहारा येथील पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी या देशव्यापी संपाला पाठिंबा देत जी डी एस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावे.मेडिकल सुविधा पेन्शन लागू करणे, डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीचें सर्व सकारात्मक शिफारशी लागू करणे,आय पी पी बी चें काम कमिशन ऐवजी वर्क लोड मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
यातील कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य जो पर्यत होणार नाही तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा बेमुदत देशव्यापी संपातून निघत आहे. या संपाला पाठिंबा देत लोहारा पोष्ट खात्यातील कर्मचारी शिवराज झिंगाडे,अर्जुन पाटील, दत्ता हक्के, कल्याण कांबळे, बालाजी पांचाळ, शोभा काटवटे, माधव वागदुरे,पूजा पवार,सनीक्षा तांबाडे,संतोष चव्हाण, अमित गिराम,नितीन वदरंगे,रमेश मंदे, सुधाकर खुर्डे,उर्मिला सूर्यवंशी, तौफिक शेख सह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.