धाराशिव
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतले यांची बदली तर सपोनि कुकलारे यांची नियुक्ती

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी फेरबदल केले आहेत.
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित तुकाराम चितले यांना दोन वर्षे पुर्ण झाल्याने त्यांची बदली प्रभारी अधिकारी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध, धाराशिव येथे करण्यात आली असून लोहारा पोलीस ठाणे येथे धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



