लोहारा / उमरगा : आज दि. 29/01/2025 वार- बुधवार रोजी लोहारा नगरपंचायत चे विद्यमान उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व लोहारा वासियांना निवेदन करित, मला लोहारा नगर पंचायत प्रभाग क्र. 15 मधुन जनतेने नगरसेवक म्हणून निवडुन देऊन मला जनसेवेची संधी दिली.
यापुर्वी माझी पत्नी नाजमिन आयुब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. यानंतर मला ही पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करीत. आज पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार पक्ष संघटनात्मक वाढीकरिता मला जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
यामुळे मी नगर पंचायत कारभारामध्ये पुर्णवेळ देऊ शकत नसल्याने मी माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा आज पत्रकार परिषद संपल्यानंतर मा. नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्याकडे सुपुर्द करित आहे. यापुढे नगरसेवक या नात्याने मी जनसेवेसाठी सदैव कार्यरत राहीन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब, मा. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या 7 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता व नगर पंचायत मधील पारदर्शक कारभाराकरिता मी सदैव संघर्षयोध्दा प्रमाणे काम करेन अशी ग्वाही उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Back to top button
error: Content is protected !!