ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी माजी ग्रा.पं. सदस्याचे बेमुदत उपोषण सुरू
१)ग्रामपंचायत कार्यालयात निधीचा हिशोब विचारल्यास उडवाउडवी चे उत्तरे देत आहेत.
२) ग्रामपंचायत कार्यालय येथून पवनचक्कीचा टॅक्स २०१९ ते २०२४ पर्यंत १०८०००० रुपये एवढा निधी जमा होता व ते परस्पर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांना न विश्वासात घेता मनमानी कारभार सरपंच व ग्रामसेवक करत आहेत व केला आहे.
३) ग्रामपंचायत मध्ये मासिक बैठक होत नाही व हे वारंवार सांगून ऐकत नाहीत व ग्रामपंचायत कार्यालयाची माहिती देत नाहीत व शिपाई कार्यालय उघडुन बसत नाही.
४) ग्रामपंचायत सदस्य गावात राहत नाहीत व त्यांचा कसलाही ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क होत नाही. ते पुणे येथे स्थलांतरित आहेत.
५) देश सहभागी कार्यक्रमात हजर राहत नाहीत.
उदा. झेंडा फडकावयाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. तरी कळवून ही कारवाई होत नाही.
अनेक मुद्दे घेऊन मी नितीन बालाजी जाधव उद्या दि. २७/०१/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मोघा बू. येथे गोरगरिबांच्या व जनतेच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण करीत आहे. तरी कोणाच्या काही अडचणी असल्या तर सकाळी उपोषण ठिकाणी यावे ही नम्र विनंती.
सामान्य नागरिक
नितीन बालाजी जाधव
9595955350
स्थळ :- ग्रामपंचायत कार्यालय, मोघा बू.