धाराशिव

वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोहारा ( धाराशिव ) : आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शेषेराव शंकरराव जावळे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
   

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री निळकंठ कांबळे व श्री प्रकाश भगत, प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. आर. सी. अष्टेकर, भास्कर जाधव सर, बालाजी इरुदे सर, प्रा. प्रशांत काळे सर, नागनाथ पांढरे सर, श्रीकांत मोरे सर हे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

श्री नीलकंठ कांबळे पत्रकार दैनिक सकाळ यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळा व कनिष्ठ महाद्वाराच्या वतीने करण्यात आला.


कबड्डी, क्रिकेट या सांघिक स्पर्धेचे, तसेच थाळी फेक, गोळा फेक, 100 मीटर धावणे, या वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा, संघाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनातील उत्कृष्ट कलाकारांचा सत्कार हि करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे सुद्धा केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत काळे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलला वेळ देण्यापेक्षा खेळासाठी वेळ दिला तर विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल असे त्यांनी सांगितले. यानंतर श्री बालाजी विरोधी सर यांनी सत्कारमूर्ती निळकंठ कांबळे व प्रकाश भगत यांच्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत मोरे सर यांनी केले.

यावेळी शाळा व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!