धाराशिव

केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना तातडीनेअतिवृष्टी अनुदान द्या – सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप

धाराशिव : केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीनेअतिवृष्टी अनुदान द्यावे तसेच मंत्रालयात प्रलंबित असलेल्या लोहारा उमरगा तालुक्यातील 86 कोटी 52 लाख रुपयांच्या अतिवृष्टी प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावे अन्यथा एक आठवड्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे साकडे. 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील पिकाचे 33% पेक्षा जास्तीचे नुकसान झाले.

नियमानुसार जिल्हा प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 80 हजार 786 बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख 59 हजार 887 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 221 कोटी 81 लाख नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता त्यात धाराशिव कळम वाशी आणि परंडा या चार तालुक्याचा समावेश होता. राज्य शासनाने त्याला मंजुरी देत 10 डिसेंबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठी 2920 कोटी सत्तावन लाख रुपये निधी वितरणास मान्यता दिली.

त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली ही प्रक्रिया पूर्ण होऊन तीन आठवडे पेक्षा जास्त कालावधी होऊन देखील अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालेली नाही.

जिल्हा प्रशासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी लोहारा उमरगा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना 86 कोटी 52 लाख रुपये अतिवृष्टी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. हा प्रस्ताव देखील मंत्रालय मुंबई येथे मदत पुनर्वसन खात्याकडे प्रलंबित आहे. त्यालाही तातडीने मान्यता देऊन शेतकऱ्याकडून केवायसी प्रक्रिया राबवावी.

धाराशिव जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक संकटात असून आर्थिक मदत मिळाल्यास दिलासा मिळणार आहे. तरी विनंती की मंजूर असलेल्या व केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी व लोहारा तालुका तालुक्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अन्यथा एक आठवड्यानंतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा जगताप यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव मंजूर करून केवायसी प्रक्रिया सुरू करावी वास्तविक दहा डिसेंबर 2024 रोजीच निधीची तरतूद झालेली असताना शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानापासून दूर ठेवले जात आहे आठवडाभर वाट पाहू अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करू.

अनिल जगताप सामाजिक कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!