धाराशिव : बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड सुनील डोंगरे हे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा कमिटीचा आढावा बैठकीसाठी दिनांक 22 1 2025 रोजी.सायकाळी 6=वाजता आले असता, त्यांचा जिल्हा कमिटीच्या वतीने सत्कार करून पुढील मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवाजी ओमन साहेब यांनी केले.
तसेच बसपाचे प्रदेश सदस्य विलासजी शेरखाने साहेब. यांनी धाराशिव जिल्हा कमिटीचा संपूर्ण आढावा व चारी विधानसभेचा कार्य अहवाल वरिष्ठांना देऊन नवीन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी बसपाच्या माध्यमातून तन मन धन लावून तसेच कोणत्याही एका जातीचा विचार न करता सर्व बहुजन समाजाला डोंगरे साहेबांच्या माध्यमातून पार्टीमध्ये आणण्याचे आश्वासन दिले.
यानंतर बहुजन समाज पार्टीचे कर्तुत्वान नेतृत्व सुनीलजी डोंगरे साहेब प्रदेश अध्यक्ष बसपा यांनी बैठकीतील कार्यकर्त्यांना सविस्तर असे मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली आहे. यावेळी बहिणीच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व बहुजन समाजांना शुभेच्छा देऊन पार्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सायकलीचा उपयोग केला पाहिजे असे सांगून कार्यकर्त्यांना मान्यवर काशीराम साहेब बहन कुमारी मायावती जी यांच्या त्यागाबद्दल मार्गदर्शन केले व फुले शाहू आंबेडकरांचे स्वप्न महाराष्ट्रामध्ये साखर करण्यासाठी सखोल असे मार्गदर्शन केले आहे.
तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद च्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना निवडणुकीचे आदेश देऊन काही कार्यकर्त्यांच्या जिल्हा कमिटी मधील निवडी केले आहे. यामध्ये बसपाच्या धाराशिव महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सुनंदा रसा यांचे प्रदेशाध्येच्या साक्षीने निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा निवडीचे आदेश देऊन नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास डोंगरे साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बसपाचे माजी प्रदेश सचिव तानाजी गायकवाड हे होते. तसेच संभाव्य जिल्हा कमिटी मधील अपेक्षित पदाधिकारी जिल्हा प्रभारी प्रवीण जगताप. जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे व लहू खुने. जिल्हा उपाध्यक्ष अभय कुलकर्णी उमरगा विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड. विधानसभा कमिटी सदस्य दीपक सोनकांबळे व बसपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!