लोहारा (धाराशिव)/प्रतिनिधी
लोहारा शहरातील दैनिक सकाळचे पत्रकार नीलकंठ कांबळे यांना राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्धल लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरात दि.21 जानेवारी 2025 रोजी यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे माजी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, सरपंच व्यंकट कागे (भोसगा), तालुका चिटणीस युवराज जाधव, शाखा अध्यक्ष महादेव कोरे, महादेव धारुळे, अजित माने, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.