लोहारा ( धाराशिव ) : भा.रा.शि.संस्था लोहारा चे कोषाध्यक्ष डाॅ. किरण वसंतराव पाटील यांचे सोलापूर येथील गिरजी हाॉस्पिटल येथे मंगळवार दि. 7 जानेवारी 25 रोजी रात्री आठ च्या दरम्यान हृदयविकारा च्या तीव्र झटक्या ने दुःखद निधन झाले.
शांत … संयमी … स्वभावाचे … वैद्यकीय क्षेत्रातील एम. एस. ( सर्जन ) पदवी असलेले डाॅ. किरण पाटील हे सोलापूर येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत होते …
प्राचार्य डाॅ. शेषेराव जावळे पाटील यांचे ते मेव्हणे व प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम यांचे ते जेष्ठ बंधु होत.
वसंतदादा पाटील हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय , शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालय लोहारा च्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.