निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश 

लोहारा : सास्तूर ता. लोहारा येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांने दि.28 सप्टेंबर 2022 ते 01ऑक्टोंबर 2022 या कालावधीत कला संचालनालय मुंबई आयोजीत शासकीय रेखाकला परीक्षा- 2022 साठी प्रशालेतील एकूण 25 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण होवून घवघवीत यश संपादन करत शाळेचा लौकिक वाढविला आहे.
शासकीय रेखाकला प्रथम इलेमेंटरी परीक्षेस 13 विद्यार्थी प्रविष्ठ होते. यामध्ये सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कु.कदम संध्याराणी बिभीषण कु.खराते किरण बाळू कु.कांबळे भाग्यश्री गंगाधर कु.बागवान मुस्कान इब्राहिम कु. कुकुर्डे सौंदर्या भिमा कु. कुकुर्डे पूजा भिमा,राजूरे विठ्ठल शंकर,पवार महेश गोवर्धन,राठोड विजयश्वर रमेश, इस्लामपूरे भाग्येश गुंडू, चौधरी रौफ अल्ताफ, कदम रोहन धनाजी,पवार शेषनाथ सिद्धनाथ. इ.सदरील परीक्षेत राजूरे विठ्ठल शंकर इ.8 वी या विद्यार्थ्यांने A’ ग्रेड मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
त्याचबरोबर शासकीय रेखाकला द्वितीय इंटरमिजीएट परीक्षेस 12 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कु.नाईक साक्षी लक्ष्मण कु.साळुंके ऋतुजा बालाजी कु.घोसले रूपा तुकाराम कु.मनाळे राणी मोहन,मनाळे सिद्धेश्वर दिपक,शिंदे सूर्या लहू, बिराजदार विश्वजित बालाजी, मोरे ओंमकार विठ्ठल, जावळे ओंमकार एकनाथ, धानूरे अभिषेक शिवाजी, सुतार विनायक श्रीमंत इ. या दोन्ही परीक्षेत तब्बल 24 विद्यार्थी उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन करत प्रशालेचा लौकिक वाढविला आहे. त्याबद्दल या यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या सचिव सौ.निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्राचार्य बी.एम.बालवाड यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!