महाराष्ट्र

तपसे चिंचोलीत खंडोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

औसा :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे रूढी परंपरेनुसार खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गावांत ७ दिवसांत जवळपास २५ अन्नदात्यांनी दिवसभरात दोन वेळच्या भोजन पंगतीची व्यवस्था केली होती.

HTML img Tag Simply Easy Learning

यात्रा महोत्सव 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान पार पडला. 1 डिसेंबर रोजी माऊली संगीत क्लासेस यांचा भजनाचा कार्यक्रम ,2 डिसेंबर रोजी सत्संग , 3 डिसेंबर रोजी गावकरी भजन , 4 डिसेंबर रोजी औराद येथील महेश वाघे यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम , 5 डिसेंबर माऊली ब्लड बँक आयोजित रक्तदान शिबीर , 6 डिसेंबर रोजी खंडू वाघे राजुरीकर यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम ,असे कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
सांगतेच्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मोहन राघोबा नेटके, अंगद रखमाजी नेटके यांच्या हस्ते श्री ची पूजा करून आरती सबिना सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी गावातील भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या सागर सरवदे ,व निलंगा नगर परिषद येथे कर निरीक्षक म्हणून निवड करण्यात आलेल्या कमलाकर सरवदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुमित मोहन नेटके , दिनेश सरवदे , प्रमोद नेटके , शिवशंकर शिंदे, प्रदीप नेटके , जालिंदर कांबळे , प्रदीप नेटके ,प्रवीण यालोखंडे , गणेश नेटके, रितेश सरवदे ,अवधूत नेटके, सोनू कांबळे , बबन नेटके ,प्रवीण नेटके, समीर मोरे ,प्रशांत नेटके यांच्यासह गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!