धाराशिव
राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

लोहारा (प्रतिनिधी)
जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग,इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यां पैकी ते एक होते.दोघांची कर्मगाथा,जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते.आशा थोर संत संताजी महाराजांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि नगरपंचायत कार्यालयात दि.८ डिसेंबर रोजी सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते नागरिक समस्त तेली समाजाच्या यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा वैशाली खराडे आणि गटनेत्या सारिका बंगले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख,माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे,नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी,जालिंदर कोकणे,प्रशांत काळे,गौस मोमीन, अभिमान खराडे, शब्बीर गवंडी, उत्तम भालेराव, स्वराज पक्ष जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,काँग्रेसचे इस्माईल मुल्ला, भाजपा सरचिटणीस दगडू तिगाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अप्पा देवकर,शालेय समिती मा.अध्यक्ष के.डी. पाटील,विठ्ठल वचने-पाटील, भाजपाचे विक्रांत संगशेट्टी,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,जनकल्याण समिती चे शंकर जाधव,यशवंत चंदनशिवे, रघुवीर घोडके,मेडिकल असोसिएशन अध्यक्ष प्रमोद बंगले,भगवान मक्तेदार, ओम कोरे,पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार,तानाजी माटे,अशोक दुबे,सुमित झिंगाडे,यांच्यासह तेली समाज लोहारा तालुकाध्यक्ष अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,कोब्रा सामाजिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान अध्यक्ष दत्ता निर्मळे,बसवंत बंगले, राजु चौगुले, विजय जवादे, सुनील देशमाने, बालाजी नाईक,उमेश जवादे, विठ्ठल बंगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




