शैक्षणिक

माकणी येथे भारत विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

माकणी (ता.लोहारा ) / प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.(६) रोजी गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती लोहारा व भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माकणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ५२ वे तालुकास्तरीय . विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक उमरगा लोहारा तालुक्याचे नूतन आमदार प्रवीण स्वामी यांच्या यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए ,पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले
तसेच कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी करून बालकलाकारांनी उपस्थितांचे मने जिंकली.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी माकणीचे सरपंच स्वाती विठ्ठल साठे , लोहाराचे तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर, लोहारा गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण ,शिक्षण विस्तार अधिकारी मुळजे साहेब, भारत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर एम जाधव , उपसरपंच फुलचंद आळंगे, माजी सरपंच विठ्ठल साठे माकणीचे ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ साठे , शालेय समितीचे सदस्य सुधाकर आलमले ,जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष चंदनशिवे ,लोहारा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष बगळे सर ,उपप्राचार्य शशिकांत साठे,माकणीचे केंद्रप्रमुख बालाजी पवार ,शालेय समितीचे अध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी, कास्तीचे केंद्रप्रमुख जगताप सर, सालेगावचे केंद्रप्रमुख पोटरे सर ,शालेय समितीचे सदस्य तुकाराम समुद्रवाने ,पर्यवेक्षक जी एन साठे , क्रीडा शिक्षक के आर पवार , एस व्ही गायकवाड, श्रीमती आर एस इंगळे , पी आर बनसोडे,, डि ए शिंदे , ए एम साठे, व्ही एम पवार, आर एम वाघमारे ,पी वाय डिग्गीकर ,आर पी चौधरी, ए पी सूर्यवंशी, आर व्ही गोरे ,एस डी शिंदे, ए एस सूर्यवंशी, एस एस साठे, पी एस चव्हाण, एस पी शिंदे, पी पी फड यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!