लोहारा :लोहारा तालुक्यातील राजेगाव व एकोंडी (लो) परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून उभे केलेले पिक पाण्याखाली गेल्याने अनेकांचे उत्पन्न कोलमडले आहे. या परिस्थितीची पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी संयुक्तरीत्या केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देत दोन्ही जनप्रतिनिधींनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, तसेच त्यांच्या अडचणींवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.
“शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त एका वर्गाचा प्रश्न नसून तो संपूर्ण समाजाच्या उदरनिर्वाहाशी निगडीत आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे,” असे मत खासदार निंबाळकर व आमदार स्वामी यांनी व्यक्त केले.

या पाहणीदरम्यान युवा नेते अजिंक्य बापू पाटील, शेतकरी नेते अनिल जगताप,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!