राजकीय

महायुतीचे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही- डॉ श्रीकांत शिंदे

जि.प. चे माजी विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांनी हेलिपॅडवर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले

लोहारा ( जि.धाराशिव ) : आमदार ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री साहेबांचे ओपनिंग बॅट्समन आहेत.चौकार मारण्यासाठी ज्ञानराज चौगुले यांच्या मागे उभे राहा. चौगुले निवडून आल्यानंतर हा मतदारसंघ वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असणार आहे.त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाची चिंता करू नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महायुती सरकार देना बँक आहे. लेना बँक नाही. आपण चौथ्यांदा ज्ञानराज चौगुले यांना निवडून द्या. त्यांचे मुख्यमंत्र्यासारखं संघर्षपूर्ण जीवन राहिला आहे.असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.

 

महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे लोहारा हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते.

 

याप्रसंगी व्यासपीठावर यावेळी व्यासपीठावर खा. श्री. रविंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती जितेंद्र शिंदे, जि.प. माजी सभापती अभय चालुक्य, भाजपा नेते राहुल पाटील, मराठवाडा युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड, आरपीआय मराठवाडा सचिव हरीष डावरे, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, आरपीआय तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे,मुस्लिम समाज धर्मगुरू अबुलसाहेब कादरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, सुरेश वाघ, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा हाजी बाबा शेख,नगराध्यक्ष वैशाली खराडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.

 

डॉ. श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, लोहारा तालुका छोटा जरी असला तरी आवाज मोठा आहे. मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी साठी 572 कोटी रुपये चा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे. मतदार संघात नऊ आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी, लोहारा शहरात महात्मा बसेश्वर मंदिराला एक कोटीचा निधी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करून दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली मात्र योजनेची टिंगल करणाऱ्यांना फक्त ‘माझ कुटुंब आणि माझी जबाबदारी’ एवढच माहीत आहे. त्यांना या १५०० रूपयाचे महत्व काय समजेल? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी मराठवाडा निरीक्षक युती सेना ॲड.आकांक्षा चौगुले, महिला तालुकाप्रमुख उमरगा संध्याताई शिंदे, उषाताई गायकवाड, ज्योतीताई चौगुले, गटनेत्या सारिकाताई बंगले, उपतालुकाप्रमुुख परवेज तांबोळी, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,शिवराज चिलगुंडे, श्रीदेवी स्वामी, नगरसेविका शामल बळीराम माळी, कमल राम भरारे,आरती ओम कोरे,आरती सतिश गिरी,सभापती संगीता किशोर पाटील,सुमन दिपक रोडगे,शमाबी आयुब शेख,नगरसेवक अमिन सुंबेकर, विजयकुमार ढगे, जालिंदर कोकणे,गौसा मोमीन,अविनाश माळी,आरिफ खानापुरे, दयानंद गिरी, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, ओम कोरे, दादा मुल्ला आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!