उमरगा / लोहारा ( जि.धाराशिव ) :
आत्तापर्यंत दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांच्या समस्या गाव तिथे विकास करण्यासाठी सदैव मी तयार असून आतापर्यंत दोन्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी केलेल्या कार्यामुळेच मी चौथ्यांदा निवडणूक लढवत असून मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भरघोस मत रुपी आशीर्वाद द्यावे असे उमरगा लोहारा या राखीव विधानसभेच्या निवडणुकीत चौथ्यांदा महायुती कडून निवडणूक लढवत असलेले विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे आता 2100 रुपये देण्यात येतील तसेच महिला सुरक्षेसाठी पोलीस दलात समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करण्यात येईल त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील गरिबांना अन्न आणि निवारा वृद्ध पेन्शन धारकांना वेतन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर उमरगा लोहारा या दोन्ही तालुक्यासाठी रोजगार निर्मिती शैक्षणिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार देण्यात येईल अंगणवाडी आणि आशा सेविकांना मानधनात वाढ देण्यात येईल वीजबिलात 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षरा उर्जेवर भर देण्यात येईल सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र शंभर दिवसाच्या आत सादर करण्याचे वचन तर तालुक्यासाठी कृष्णा खोरे 21 टीएमसी पाणी शेतकऱ्यासाठी देणार फेरीवाले भाजीविक्रेते फळ विक्रेते यांच्याकरिता व्यापारी संकुल व भाजी मंडई बांधण्यात येईल बचत गटांच्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल एमआयडीसी मध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात येईल सुशिक्षित बेरोजगारांना नवीन उद्योगधंदे उभारण्यात येईल मतदार संघातील शैक्षणिक संस्था व शासकीय शाळांना शासकीय मदत देऊन सर्वांगीण विकास करण्यात येईल माकणी येथून मंजूर असलेली उमरगा व लोहारा तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार धाकटे पंढरपूर म्हणून परिचित असलेले माकणी डॅम जवळ पर्यटन स्थळ विकसित करणार मागासवर्गीय वस्तीसाठी विशेष निधी देत रस्ते पाणी सभागृह हायमस्ट लॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध मतदार संघातील सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही तालुक्यात स्वतंत्र महिला रुग्णालय उभारणार मराठा समाजातील होतकरू लघु उद्योजका साठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचें लंक्षाक वाढवणार यासह आदी दोन्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेत उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, भाजपा नेते तथा माजी जि. प बांधकाम सभापती अभय चालुक्य, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, लहुजी क्रांतीसेना जिल्हाध्यक्ष विजय तोरडकर, रयत क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने, यांची प्रमुख उपस्थिती होती.