लोहाऱ्यात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील एका सोन्याचांदीचे दुकान पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. ही घटना गुरूवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाटोदा रस्त्यालगत असलेल्या कृष्णा ज्वलर्समध्ये चोरी करण्यासाठी ५ ते ६ जण गुरुवारी मध्यरात्री २ ते २:३० दरम्यान आले. गाडी दुकानासमोर लावून गॅस कटरच्या सह्याने त्यांनी दुकानाचे कुलूपं तोडण्यात सुरवात केली. याचा आवाज येत आसल्याने बाजुच्या दुकानात झोपलेल्या एकाने बघितले. त्यावेळी त्यांना काही जण कुलूप तोडत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच कृष्णा ज्वलर्सचे मालक पिंटू उर्फ अंबादास पोतदार यांना अनेकवेळा फोनकेला.

पण त्यांनी फोन उचलला नाही. परंतु पोतदार यांनी दुकानातील सीसीटीव्ही मोबाईलला जोडलेली असल्याने त्यांनी लगेच सीसीटीव्ही चेक केली असता दुकानाचे कुलूप गॅस कटरने तोडत असल्याचे दिसले. श्री पोतदार यांनी त्याचे भाच्चे ओमकार पोतदार व शुभम पोतदार यांना सोबत घेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन

आरडाओरडा सुरु केली. नागरिकांचा आवाज येताच चोरट्यांनी तेथून पाटोद्याच्या दिशेने पळ काढला. यावेळी दुकानाला लावलेल्या १६ कुलूपांपैकी चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने १० कुलपे तोडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अजित चिंतळे, पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पवार, पोलिस नाईक पद्म गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ठसा तज्ज्ञ पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पाहणी केली.गुरुवारी रात्री साडे सातच्या सुमारास उमरगा उपविभागिय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे.

 

 

                         🔻 जाहीरात 🔻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!