लोहारा / प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची लोहारा तालुका आढावा बैठक शुक्रवारी सदगुरु क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित साठे, यांनी तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदी बळी गोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शेतकरी आघाडी च्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत थोरात शेतकरी आघाडी तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव मोरे तर लोहारा शहर अध्यक्षपदी आप्पा उपरे यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे,
यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित साठे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्याचे कार्य करेल व युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला चांगला व सुसंस्कृत पर्याय जनतेला मिळाला असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे गंगाराम भोंडवे, संजय मुरटे,ओमकार चौगुले, तुळशीदास पवार, नितीन मुळे,धनंजय फत्तेपुरे,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.