धाराशिव

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बिराजदार रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

लोहारा / उमरगा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांच्या हस्ते तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून लोहारा तालुक्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे. यात लोहारा तालुक्यातील सास्तुर ते कडदोरा या रस्त्यासाठी ९ कोटी २० लाख, तर सालेगाव येथे सालेगाव ते कलदेव लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, सालेगाव ते काळा लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ६८ लाख निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून सालेगाव येथील मारुती मंदिर सभामंडपासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सालेगावच्या सरपंच भाग्यश्री पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, किसान सेल तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गायकवाड, युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, चेअरमन मुरलीधर पाटील, माजी चेअरमन प्रकाश घोगे, गोविंद साळुंके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, मोहन बडूरे, ग्रामपंचायत सदस्य, मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, शिलाबाई साळुंके, श्रावण चेंडके, सचिन देशपांडे, सचिन घोगे, भास्कर बिराजदार, राजेंद्र गरड, बालाजी गरड, वग्रसेन घोगे, बिभीषण घोगे, शिवाजी घोगे , सुशील घोगे, नितीन घोगे, अमोल जाधव, महेश देशपांडे, इंजिनीयर संतोष घोडके, ज्युनियर इंजिनियर पठाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!