महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर ; 155 रुग्णांची तपासणी

लोहारा : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे बुधवारी रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी , नेत्ररोग तपासणी, असांसर्गिक आजार, बीपी, शुगर आदी आजारांवर १५५ रूग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. इरफान शेख ,डॉ. कोमल मगर ,नेत्रचिकित्सा अधिकारी दस्तगीर मुजावर , अल्लाबक्ष बागवान ,अंगद गिराम ,दत्ता बोर्डे, अंजली साळुंके , मिटकरी , विकास थोरात यांनी रुग्णांची तपासणी केली.शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवा संघटना, बसवेश्वर जयंती उत्सव कमिटी व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!