कास्ती खु. येथील ७३ लक्ष रु. च्या विकासकामांचे भूमिपूजन / लोकार्पण संपन्न

लोहारा (जि.धाराशिव ) : आमदार ज्ञानराज चौगले यांच्या प्रयत्नातून कास्ती खु. ता.लोहारा ग्रामपंचायतीसाठी मंजुर असलेल्या सुमारे ७३ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन / लोकार्पण गुरुवार दि.२८ रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कास्ती खु. गावासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे योजनेंतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे – १० लक्ष रु., डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मागासवर्गीय वस्तीत रस्ता करणे- १० लक्ष रु., आमदार निधीतून देवी मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे – ५ लक्ष रु., जनसुविधा योजनेतून गुरुनाथ वकील घर ते शामराव मुळे घर रस्ता करणे-१० लक्ष रु., २ स्मशानभूमी बांधकाम करणे – १८ लक्ष रु., अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या व तांडा वस्तींमध्ये अंतर्गत रस्ते व गटार करणे – २० लक्ष रु. या कामांसाठी एकूण ७३ लक्ष रु. निधी मंजूर केला असून यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व उर्वरित कामांचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, सरपंच सागर पाटील, उपतालुका प्रमुख परवेज तांबोळी, इंद्रजीत लोभे उपसरपंच, बालाजी पाटील चेअरमन, साहेबराव कदम, हरिदास भंडारे, दशरथ साळुंके, विनोद भंडारे, गुरूनाथ वकील, केशव सगट, अरुण जगताप, वीरभद्र पाटील, बाळासाहेब वाघ, दत्ता गुरव, शेषेराव थोरात, श्रीशैल पाटील, साहेबराव कदम, हरिदास भंडारे, राजेंद्र हिंगमिरे, अण्णाराव भुजबळ, अन्नापा भुजबळ, शिवराज लद्दे, सदाशिव हुलसुरे, हरिभाऊ मगर, सुर्यकांत कदम, शेषेराव थोरात, तिम्मा माने, गणेश हजारे, धनराज हजारे, कुमार कदम, राजू शेख, सचिन बारगळ, पांडुरंग गुंड, अण्णाराव भुजबळ, बाळासाहेब वाघ, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!