लोहारा ( जि.धाराशिव ) : मंगळवार रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत “राष्ट्रीय फिलॅटली दिनाचे”( पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करण्याचा अभ्यास व छंद) औचित्य साधून राष्ट्रिय पत्रलेखन स्पर्धा (ढाई आखर) या उपक्रमांतर्गत “हस्तलेखणातील आनंद व संगणक युगात पत्र लेखनाचे महत्व ” या विषयावर इयत्ता पहिली ते आठवीच्या विध्यार्थी व शिक्षकांसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याविषयी माहिती देताना लातूर,धाराशिव डाक अधीक्षक श्री एस. एन.अंबेकर यांनी सांगितले की आजच्या डिजिटल युगामध्ये हस्तलेखन कला दुर्लक्षित होत आहे त्यामुळे प्रत्येकजण आज एकमेकांना मोबाईलवरच शुभेच्छा देताना दिसतात या स्पर्धेमुळे विध्यार्थ्यांना लिहण्याची सवय लागून आवड निर्माण होईल. यासाठी तुळजापूर उपविभाग प्रमुख श्री अनिल जाधव, लोहारा पोस्ट मास्तर श्री उध्दव कल्लारे, यांच्या मार्गदर्शन लाभले आणि या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री शिवराज झिंगाडे, मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे, सौ सविता जाधव, यांनी परिश्रम घेतले.