लोहारा (प्रतिनिधी) महेश गोरे
नारायण गड जिल्हा बीड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारी व जनजागृती करण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने कन्या प्रशाला येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या गरजवंत मराठ्यांच्या दसरा मेळावा 12 ऑक्टोंबर रोजी नारायण गड येथे होणार असून या मेळाव्यासाठी लोहारा उमरगा तालुक्यातील सकल मराठा समाजाने जास्तीत जास्त उपस्थिती लावावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने मराठ्याची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आपल्या सर्वांनी एकजूट दाखवून मनोज दादांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी लोहारा तालुक्यातील सर्व गावातील मराठा समाजाने आपल्या गावात बैठक घेऊन नियोजन करण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले.