लोहारा : लोहारा शहरातील ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि.धाराशिव शाखा – लोहारा या पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्या गुरूवार दि.२६ रोजी सप्तरंग मंगल कार्यालय, लोहारा येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

HTML img Tag
याठिकाणी तालुक्यातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण शिबीर, स्पर्श रुग्णालय सास्तुर च्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर, महिला बचत गट उत्पादनांचे विक्री प्रदर्शन, याचबरोबर मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या शासकीय योजनांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे. लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी संचालक मंडळ यांचे वतीने केले आहे.
Back to top button
error: Content is protected !!