माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले

लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला असल्यामुळे येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

आज मंगळवारी दि. 24/09/2024 रोजी ठीक 19:45 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे द्वार क्रं 6 व 9 हे 10 सेंटिमीटर ने उघडूण तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत द्वार क्रं 1,14,6,7,8 व 9 असे एकूण 6 वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने चालू असून 2290 क्यूसेक्स (64.84 क्यूमेक्स ) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

पुरनियंत्रण कक्ष
निम्न तेरणा प्रकल्प माकणी ता. लोहारा , जि. धाराशिव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!