शांततेचा संदेश देणारे पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

लोहारा/उमरगा : ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला अशा थोर ईश्वराचे चाहते हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून लोहारा शहरात गुरुवारी ईद-ए-मिलादुन नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

पैगंबर जयंती दिनानिमित्त शहरात महबूब सुभानी दर्गा पासून मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे इदगाह मस्जिद या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली.
हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आई वडिलांची सेवा दिन दुबळ्यांना मदत करा तो कोणत्याही जाती धर्माचा असो मानव म्हणून त्या व्यक्तीला मदत करा शेजारी उपाशी राहू नये याची दक्षता घ्या अशा अनेक दिलेल्या संदेशाचे पालन मानवाने केले पाहिजे म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ईद ए मिळादुन्नबी मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या आदराने साजरी केली जाते.


या कार्यक्रमात भव्य अशी शहरातून लहान चिमुकल्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली.यावेळी ईश्वराचे नामस्मरण करत नाते नबी मिलाद पठण करण्यात आले.या रॅली दरम्यान मक्का व मदिना यांची प्रतिकात्मक चित्र ट्रॅक्टर वर रेखाटण्यात आले होते.
उंट व घोडयांच्या सजावटीने रॅलीचे आकर्षण बनले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लहान चिमुकल्यांना खाऊ व पाणी वाटप केले.
आज उन्हाचा पारा अधिक होता अशा उन्हाच्या तीव्रतेत देखील लहान बालकांनी रॅलीत सहभाग नोंदवला तर यावेळी महंमद फकीर यांनी अन्नदान केले. या रॅली प्रसंगी बंदोबस्तसाठी असलेले पोलीस निरीक्षक अजित चिंतले तर महसुलचे नायब तहसीलदार महादेव जाधव यांचा जुलुस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 या जुलुस मध्ये धर्मगुरु फज्जूसाहेब कादरी, जुलुस कमिटी अध्यक्ष शब्बीर गवंडी, कोषाध्यक्ष हैदर शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, कमिटी उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक गौस मोमिन, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, अमिन कुरेशी, सलिम कुरेशी, आयुब खुटेपड, पेशमाम शमशोद्दीन, आदमशाह फकिर, उस्मान हेड्डे, महेबुब बागवान, रसुल बागवान, ईस्माइल मुल्ला, रौफ बागवान, हाजी बाबा शेख, इकबाल मुल्ला, महेबुब गवंडी, अहेमद शेख, शेरु मासुलदार,

नयुम सवार, शम्मु भोंगळे, जिंदावली शेख, दादा मुल्ला, वहाब हेड्डे, अजिज सय्यद, आय्याज शेख, यासिन हेड्डै, इम्रान भोंगळे, शब्बीर गंजीवाले,मोईज शेख,शाहिर इनामदार, इकबाल कुरेशी, खालिद खुटेपड, खयुम कुरेशी,आरबाज फकिर,सिराज सिद्दीकी,रियाज महामुद शेख, शरीफ बागवान, आमन पठाण,आरबाज कमाल, शाहरुख गवंडी,तोहिद ईमानदार, हामजा खुटेपड,जहिर खुटेपड,ताहेर पठाण, यासिन शेख, जावेद शेख, नासिर शेख, नजीर शेख, सुलतान शेख, मदार सय्यद, शाहिद बागवान,ईमाम बागवान,वजिर मनियार, वजिर आत्तार, बक्षु सौदागर महमहदी हिप्परगे, मोईन चाऊस, फेरोज गवंडी, अजिम बागवान, महपाशा सुंबेकर, निहाल मुजावर, आसिफ खानापुरे, बाबा बागवान, महमहद सुंबेकर, आल्ताफ सुंबेकर, आरिफ बागवान, बिलाल बागवान, महेबुब पठाण, आरबाज गवंडी, कदीर सय्यद, शकील शेख, अब्दुल मुल्ला, अस्लम आत्तार, महेबुब फुलारी, महेबुब फकिर, मन्ना खुटेपड, सलीम सवार, खाशिम मुल्ला, जलाल मुल्ला, सकलेन शेख, खुनमिर मोमिन, पाशा मोमिन, बिलाल गवंडी, इम्रान जेवळे, गुलाब फकिर, ताहेर फकिर, सादिक फकिर, बबलु फकिर, सादिक शेख, यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होता. यावेळी पो.नि.अजित चिंतळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!