लोहारा / उमरगा : लोहारा शहरातील सन १९८५ ला स्थापना झालेल्या वीरशैव कक्कया गणेश मित्र मंडळाने यावर्षी गणेश मुर्तीची स्थापना साई मंदिरात करण्यात आली होती. गणपती बाप्पाची रोज सकाळ संध्याकाळ भक्तिभावाने पूजाअर्चा करून आरती होत असे. त्याचबरोबर यावर्षीच्या गणेश मंडळाकडून संगीत खुर्ची,लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स , भाषणकला, गीत अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आणि नंबर काढून बक्षीस वितरण करण्यात आले.

यावर्षीच्या मिरवणुकी दरम्यान देशांमध्ये होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा विषय लक्षात घेऊन महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे, महिलांवर अत्याचार नव्हे तर आदर, मानसन्मान व्हायला पाहिजे याचे महत्व पुरुषांमध्ये पटवून देण्यात आले. मिरवणुकीच्या सजावटीमध्ये महिला सक्षमीकरणाचे स्लोगनचे बोर्ड लावून करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान नुसताच डॉल्बीचा मोठा आवाज न करता सुंदर आवाजात लहान मुलांचे डान्स आयोजित करण्यात आले होते. काही लहान मुलं बाहेरुन आले होते तर काही लहान मुलं समाजातीलच सांस्कृतिक कला व डान्स सादर करत होते. त्यांना प्रोत्साहन म्हणून लोकांनी भरभरून असे जागेवर शंभर दोनशे पाचशे हजार या रूपात बक्षिसाचा वर्षाव केला आणि पुढील कार्यक्रमात याहून चांगली कला अवगत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

यावर्षीचे गणेश मंडळाचे अध्यक्ष विनोद विनायक कोकणे, उपाध्यक्ष रोहित नारायणकर, खजिनदार स्वप्निल नारायणकर, मिरवणूक प्रमुख नितीन नारायणकर शुभम कोकणे दत्ता कोकणे राहुल कोकणे विकास नारायणकर विशाल कोकणे रवींद्र कोकणे प्रभाकर कोकणे, बाबुराव नारायणकर लहू नारायणकर विशाल शेवाळे, नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर ,साई मंदिराचे अध्यक्ष गोरख नारायणकर, सचिव अंकुश नारायणकर, पांडुरंग कोकणे समाजातील ज्येष्ठ अनुभवी भीमराव नारायणकर, गोरख कोकणे, शरणात कोकणे ,ज्ञानेश्वर नारायणकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी नारायणकर, विलास कोकणे ,सूर्यकांत कोकणे, विष्णू नारायणकर, ज्ञानेश्वर कोकणे, राजू कोकणे, देवानंद शेवाळे ,दयानंद शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, गोविंद कोकणे, दिगंबर कोकणे महिलांमधून दररोज आरतीच्या अगोदर गाणे म्हणत होते असे चंद्रावळ अर्जुन नारायणकर, सुनिता कोकणे ,शिल्पा कोकणे, सुवर्णमाला नारायणकर, लता कोकणे लहान मुलांमधून परि जनक कोकणे, आराध्या बाबुराव नारायणकर ,परि ज्ञानेश्वर कोकणे व इतर शेवाळे बंधू, रणशूर बंधू, गल्लीतील सर्व समस्त महिला मंडळ तसेच आपले ज्येष्ठ इत्यादीने सहभाग नोंदवून उत्सव आनंदात पार पडला.
Back to top button
error: Content is protected !!