शिवसेना नेते खा. राऊत यांची जामीनावर सुटका ; किल्लारीत शिवसैनिकांनी केला जल्लोष

किल्लारी : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी जामिनावर सुटका झाल्यामुळे किल्लारी येथील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही
या न्यायाने अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांची जामीनावर सुटका झाल्यामुळे किल्लारी येथे शिवसेनेचे उपसभापती किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले, युवासेनेचे अली बागवान, सचिन मोरे, प्र सरपंच युवराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास हजारे, पिंटू राजपूत , साईनाथ पवार, शरद शिंदे आदी उपस्थित होते.