विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील व विज्ञानवादी शिक्षकाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सुधीर कोरे
जेवळी ( ता.लोहारा,जि.धाराशिव ) : राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार हे जेवळी (ता. लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रामकृष्ण पाटील जाहीर झाले असून गुरुवारी (ता.५) मुंबई येथे शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. या विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील व विज्ञानवादी शिक्षकाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
लोहारा तालुक्यातील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे या परिसरात एक नावाजलेली शाळा म्हणून गणली जाते या शिक्षण संस्थेची स्थापना ही स्वातंत्र्यपूर्व १९३७ ला झाली आहे. या शाळेत रामकृष्ण व्यंकटराव पाटील हे विज्ञान विषयाचे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आर.व्ही पाटील हे परिसरातील विद्यार्थ्यांत प्रयोगशील, विज्ञानवादी, अभ्यासू व विद्यार्थी प्रिय, शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विज्ञान प्रयोगाला चौदा वेळेस जिल्हास्तरीय, आठ वेळेस राज्यस्तरीय, एक वेळेस राष्ट्रीय, एक वेळेस आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या शाळा तेथे प्रयोगशाळा व अपूर्व विज्ञान मेळावा उपक्रमात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासमंडळ सदस्य, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र राज्य स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील सीसीआरटी, आपत्ती व्यवस्थापन फोल्ड स्कोप निर्मितीत मोलाचे योगदान दिले. जिल्ह्यात विज्ञान चळवळ ही प्रत्येक शाळेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. कोळीड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील दोन हजार शाळेपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केले आहे. विज्ञान विषयाचे अध्यापन हे रंजक, परीनामकारक व विद्यार्थी केंद्रीत करण्यासाठी परिश्रम घेतला आहे. या बरोबरच अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून या परिसरात प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्य अनेक वर्षांपासून करत आहेत. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक जबाबदारी घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा कार्य त्यांनी केले आहे. अशा गुणी शिक्षकाला गुरुवारी (ता.५) मुंबई येथे राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारा २०२३ -२० साठीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव आर एन कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज पांडे आदींची उपस्थिती होती.
मराठवाडयातील दुष्काळी भागातील कृत्रिम पावसाचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. त्या प्रयोगाची दखल सकाळ अग्रोवननेही घेतली होती. कृषी दैनिक अग्रोवनने आयोजित उपक्रमात डॉ. राजा मराठे डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थितीत यांचा कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता.