माजी विद्यार्थ्यानी दिले जिल्हा परीषद शाळेत २५ सिलिंग फॅन

लोहारा (उस्मानाबाद ) : 
राष्ट्रीय एकता दिना चे औचित्य साधुन लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतीस इयत्ता पहीलीचे सन १९९३ सालीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत सोमवारी माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. यावेळी या विद्यार्थ्यांनी २५ सिलिंग फॅन भेट स्वरूपात दिले.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल,इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लोहारा तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा पहिला माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा २९ वर्षापूर्वी पहिली च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी हा योगायोग जुळवून आणला.यावेळी विद्यार्थी व शिक्षक आपापल्या मनोगत व्यक्त केले.जुन्या आठवणींना उजाळा देत हास्यविनोदात विद्यार्थी शिक्षक रमले.
कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव,सुभाष चव्हाण,मुख्याध्यापक मधुकर रोडगे,माजी मुख्याध्यापक दिनकर कुलकर्णी,सेवानिवृत्त शिक्षक शरणाप्पा जट्टे,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के.डी.पाटील, आजी माजी शिक्षक एस एम शेख, माळी सर,कांबळे मॅडम,बी डी बादुले सर,घोडके सर,माळी मॅडम,पी एम बडूरे,डी एम फावडे,संजय संदिकर ,मोहन शेवाळे, प्रशांत लांडगे यांच्यासह

विद्यार्थी पांडुरंग घोडके,हरी पवार,वसीम पठाण,शकुर पठाण,जावेद शेख,अशोक हंचाटे,मनोज बादुले,सुशांत कांबळे,खासीम मुल्ला,शाम कोरे,शाम नारायणकर, लिबराज कटके,बाळु माशाळकर, गणेश काटगावे, अमोल माळी,योगेश मिटकरी,हरी पवार,संतोष शेवाळे, सुधीर कदम,योगेश वाघमारे,ईलाही सवार यांच्यासह आजी माजी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरज शिंदे यांनी केले. सुञसंचालन अशरोद्दीन शेख यांनी केले. तर आभार शिक्षक सुरेश साळुंके यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!